सुरेश प्रभू यांच्यावरची टीका दुर्दैवी - राजन तेली
सिंधुदुर्ग, दि. 04, जानेवारी - सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल झाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस त्यांच्यामुळेच होत आहे. असे असताना सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनकडून झालेली टीका दुुर्दैवी आहे. असे मत भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुसर्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन माजी रेल्वेमंत्री आणि विद्यमान केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते.हे काम काही दिवस बंद आहे, त्यामुळे प्रभू यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. याबाबत तेली यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली. या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी ह्या टर्मिनसला विरोध दर्शविला होता. मात्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना हे टर्मिनस मंजूर करून त्यांनी त्याचे कामही सुरू के ले. पण हे काम धीम्या गतीने सुरु आहे. या विषयी सुरेश प्रभूंशी संपर्क सधला असता प्रभूंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधून या कामाला गती देण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होणार आहे, असे राजन तेली यांनी स्पष्ट केले.