पाथर्डीमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ
त्यानंतर कामाची रूपरेषा सांगण्यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांनी बोलताना म्हटले की, गावातील कामाची जबाबदारी ही ग्रामपंचायत वरती असते स्वर्गीय राजभाऊ यांनी १०० वर्षाचे काम २० वर्षात करून दाखवले. राजाभाऊंनी आपल्या जीवनात माणसं खूप जोडली तीच माणसं जोडण्याची शिदोरी कायम ठेवून राजा भाऊंचा कार्यकर्ते म्हणून काम करू.
गेल्या महिन्याभरापासून गावच्या कामाचा पाठपुरावा केला. या गावासाठी शासनाचा निधी असुन गेल्या दोन वर्षांत काम झाले नाही. ज्या कामाचे उद्धघाटन आता केले आहे ते भ्रष्टाचार मुक्त काम होईल. राजकारण हे निवडणुकीपुरते असते त्यानंतर गावात जर चांगले काम होत असतील तर त्यात राजकारण आणू नये असे मत भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौड यांनी व्यक्त केले.
ऍड. हरिहर गर्जे हे म्हणाले की, गावकऱ्यांनी एक दिलाने आमच्यावर जबाबदारी सोपवली असून गावात विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.गावाने सर्व कामाला सहकार्य करावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर बांगर,सुत्रसंचालन बबनराव मंचरे तर आभार पांडुरंग गोसावी यांनी मानले.