Breaking News

तिळगुळातून माणसां - माणसांत सुसंवाद वाढवा : आ. थोरात.


संगमनेर प्रतिनिधी :- सध्याचे जग सोशल मिडियामुळे वेगवान झाले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना एका सेकंदात आणि एकाच ‘क्लिक’वर सर्वत्र पोहोचते. मात्र सोशल मिडियाच्या अशा वेगवान जगात जगात तिळगुळांमधून माणसांमाणसांमध्ये आणखी सुसंवाद वाढवावा, अशी अपेक्षा राज्याचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक खेमनर यांच्या अकस्मात निधनामुळे एक जागा रिक्त झाली. या जागेवर त्यांचे चिरंजीव इंद्रजित खेमनर यांची निवड झाली आहे. 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, भाऊसाहेब कुटे, शंकरराव खेमनर, बाबा ओहोळ, सतिषराव कानवडे, आर. बी. राहाणे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे व संचालक पांडुरंग घुले, चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, संपतराव गोडगे, बाळासाहेब मोरे, नानासाहेब शिंदे, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, बाळासाहेब शिंदे, संतोष हासे, रमेश गुंजाळ, अभिजीत ढोले, जगन्नाथ आव्हाड, गोजरा जोंधळे, शांता वाकचौरे, केशवराव दिघे, राजेंद्र कढणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी इंद्रजित खेमनर यांच्या निवडीबद्दल त्यांचा आ. थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.