सांगलीतील पासपोर्ट कार्यालय मार्च अखेर कार्यान्वित - ज्ञानेश्वर मुळे
सांगली, दि. 18, जानेवारी - सध्या पासपोर्ट ही चैनीची अथवा श्रीमंतीची वस्तू राहिली नाही. मात्र अनेकांकडे पासपोर्ट नाही. त्यामुळे पासपोर्ट ही आता जनतेची चळवळ बनली आहे. मार्च 2018 पूर्वी देशभरात 251 नवीन पासपोर्ट कायालर्ये सुरु करण्यात येत आहे. त्यातील तीन पासपोर्ट कार्यालये महाराष्ट्रात असून सांगली येथील पासपोर्ट कार्यालय येत्या मार्च महिनाअखेर कार्यान्वित होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट विभाग) ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित बैठकीनंतर ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. सामान्य माणसाच्या विचार कक्षेत परराष्ट्र मंत्रालय जवळजवळ नव्हतेच. त्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाधिक सुविधांचा सुलभरित्या लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. परदेशातील भारतीय नागरिकांच्या योजना व अडचणी, पासपोर्ट, व्हिसा व समुपदेशन अन्य विविध सेवांचा लाभ देण्यासाठी व परदेशात त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कटिबध्द आहे, अशी ग्वाहीही ज्ञानेश्वर यांनी दिली.