महाराष्ट्रातील पाण्यासाठी वेळीच उपाय गरजेचे - खा. हरिश्चंद्र चव्हाण
नाशिक, दि. 18, जानेवारी - महाराष्ट्रात भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज असल्याच्या भावना दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या. अर्थ संकल्पावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषद आयोजित केली होती. त्यावेळी चव्हाण बोलत होते.
सिंचनाच्या मुद्दावर बोलताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात 18 टक्के सिंचन क्षमता झाली असून, ती 40 टक्के करण्याचा मानस माननीय नितीन गडकरी व राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. परंतु माझ्या दिंडोरी मतदारसंघात सुरगाणा व पेठ या तालुक्यांमध्ये अत्यंत अल्प सिंचन क्षमता आहे. सुरागाण्यात 1.5 टक्का तर पेठ मध्ये 4 टक्का सिंचन आहे. सुरागाना व पेठ साठी क्रमशः 15 व 10 एम .आय टयांक प्रशासकीय मान्यते साठी शासन दरबारी असून त्याला मंजूर केल्यास नार पार नदी जोड प्रकल्पाला सुरगाणा व पेठ मधून होणारा राजकीय विरोध करणार्यांचा विरोध जनता मोडून टाकेल. लघु पाटबंधार्या योजनेत सुरागाना व पेठ साठी क्रमशः 15 व 10 एम आय टयांक प्रशासकीय मान्यतेस उशीर झाल्यास व वेळेत पूर्ण न केल्यास नार पार नदी जोड प्रकल्पाला मोठा विरोधाला सामोरे जावे लागेल .यासाठी सुरगाणा व पेठ साठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.