Breaking News

पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी, 39 जणांवर गुन्हा दाखल

सांगली, दि. 18, जानेवारी - पूर्ववैमनस्यातून सांगली शहरातील खणभाग परिसरातील मकानदार गल्ली येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. याबाबत या दोन्हीही गटाच्या महिलांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून 39 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मकानदार गल्ली परिसरात बिसमिल्ला सलीम देसाई व रेश्मा तसलीम जमादार या दोघीही राहण्यास आहेत. गत काही दिवसापासून या दोन्ही महिलांच्या कुटुंबियात किरकोळ क ारणावरून वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. ऐन गर्दीच्या खणभाग परिसरात दोन गटात हाणामारीची घटना घडल्याने या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.