Breaking News

अंधेरीत गोदामाला आग; दोन कामगार जखमी

मुंबई, दि. 22, जानेवारी - अंधेरीतील एमआयडीसी मरोळ येथील मेस्त्री इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असलेल्या एका गोदामाला आग लागली. मध्यरात्री एकच्या सुमारास ही आग लागली आहे. या दुर्घटनेत गोदामातील दोन कामगार जखमी झाले असून त्यांना कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


या आगीत गोदामात असलेला कच्चा माल, बॉयलर, प्लॅस्टिक माल, प्लॅस्टिक पॅनलसह अन्य काही कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. मरोळ येथील तुंगा इंटरनॅशनल हा ॅटेलजवळील मेस्त्री इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामाला ही भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.