Breaking News

कट्टा महाविद्यालयात पडोस युवा सांसद कार्यक्रम


सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - राष्ट्रीय युवा नेता योजना अंतर्गत नेहरू युवा संघटन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण-कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वा णिज्य महाविद्यालयात रविवारी पडोस युवा सांसद कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मालवण तालुक्यात कट्टा महाविद्यालयात आयोजित पडोस युवा सांसद कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणेचे समतादूत साईनाथ गावकर यांनी ’’तरुणाईच्या हाती समतेच्या विचारधारेची दोरी’’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ’’योगा’’ या विषयावर योगा अभ्यासक प्रिया पावसकर आणि मोरजकर यांनी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास आणि विविध विषयांवर मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. समतादूत साईनाथ गावकर यांनी ’’महापुरुषांची वाटणी’’ या विषयावर कविता सादर करून विद्यार्थ्यांना समतेच प्रबोधन केल. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. मिराशी, नेहरू युवा स्वयंसेवक राहुल पवार, नचिकेत पवार, मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.