कल्याणमध्ये चार भोंदू बाबांना अटक
ठाणे : कल्याण पश्चिमेकडे एका आरटीओ एजंटला भुरळ घालत त्याला लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार भोंदू बाबांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वर्दळीच्या आरटीओ कार्यालयाच्या परिसरात घडला. मोकनाथ राजेस्थानी, धनानाथ कालबेलीया, किसननाथ कानुनाथ आणि विजयनाथ कालबेलीया अशी गजाआड झालेल्या भोंदू बाबांची नावे आहेत. नागरिकांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्यांना खडकपाडा पोलिसांनी या चौघाही भोंदूंना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई तपसानंतर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेकडील आरटीओ परिसरात राहणारा रोहन बाबडे हा आरटीओ एजंट म्हणून काम करतो. आरटीओ कार्यालयात आपले काम करत असतांना चार साधू त्याच्या जवळ आले. त्यांनी रोहनला बोलत ठेऊन त्याच्यावर भुरळ घातली. त्यामुळे त्याचा तोल गेल्याने बसल्या जागी तो कोसळला. या बाबांनी त्याच्याकडील सामान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांना संशय आला. त्यांनी रोहनकडे धाव घेतली. रोहनच्या बाबतीत घडलेला प्रकार लक्षात आला. हे बाबा पळून जाण्याच्या बेतात असताना नागरिकांना त्यांना पकडून बेदम चोप दिला.