अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन तर्फे विविध कार्यक्रमांची पर्वणी असलेले 6 वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे यांनी दिली.
हे संमेलन 11 ते 14 जानेवारी दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. संमेलनाचे उध्दाटन पद्मश्री डॉ. के. इनोक यांच्या हस्ते होणार असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर असणार आहेत. यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, डॉ. विजय खरे, डॉ. रावसाहेब कसबे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयावरील परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन सादर होणार आहेत. यामध्ये दलित चळवळींची सद्यस्थिती आणि लेखकाची भूमिका, राजकिय पक्ष आणि दलित राजकारण, मी आणि माझे साहित्य आदी विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.