Breaking News

शहर इलाखा साबां भ्रष्टाचारामुळे निकाली प्रकरणांना फुटणार वाचा .आ.चरणभाऊ वाघमारे यांचे कार्यालय बनले सल्ला केंद्र

मुंबई/विशेष प्रतिनिधी :- मुंबई साबां प्रादेशिक विशेषतः शहर इलाखा विभागाच्या विविधांगी भ्रष्ट कारभाराचा ओघळ विस्मरणात गेलेल्या काही निवडक प्रकरणांनाही वाचा फोडण्यास कारणीभुत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सन 2000 ते सन2014 या कार्यकाळातील काही प्रकरणांची पुर्नचौकशी तर फाईल झालेले काही न्यायालयीन खटले पुन्हा खुले होण्याच्या दृष्टीने कायदेशीर चाचपणी सुरू असून आ.चरणभाऊ वाघमारे यांचे संपर्क कार्यालय या इच्छुक मंडळींचे सल्ला केंद्र बनले आहे.


शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात सन 2014 ते सन 2017 या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराची दशा आणि दिशा स्पष्ट झाली.भ्रष्टाचाराच्या चौकशी संदर्भात पाठपुराव्याचे सातत्य ठेवले,भ्रष्टाचार्यांना सजा देणे एव्हढाच शुध्द हेतू ठेवला तर भ्रष्टाचारी व्यक्ती कितीही मोठी असली,भ्रष्टाचारी व्यक्तीच्या मागे शासन यंञणा उभी असली तरी चौकशी दडपता येत नाही हे शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करून आ.चरणभाऊ वाघमारे यांनी राज्यातील जनतेसह शासन प्रशासनाला दाखवून दिले.
आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या या सातत्यशीलते मुळे अन्य मंडळींचा उत्साह द्विगुणीत झाला असून ही मंडळी जुन्या काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना नव्याने बोर्डावर आणण्याचा विचार करीत आहेत.

या जुन्या प्रकरणांमध्ये मुंबई मेट्रोपालिटीयन कोर्टात एसएस 100/2004,एसएस 785/2004 अशोक सोनवणे व इतर 8 विरूध्द मोतीराम घरबुडे या 2014 मध्ये कन्क्लुज झालेल्या खटल्याचा समावेश असण्याची चर्चा साबांत सुरू आहे.या खटल्यातील काही साक्षीदार गडबडल्याने हा खटला निकाली काढण्यात आला होता.याखेरीज अशोक शिंदे (मुकादम) विरूध्द महाराष्ट्र शासन हा सन 2002 ते सन 2007 दरम्यान मुंबई उच्च न्यायालय इमारत भ्रष्टाचारा संदर्भात सुरू असलेला खटलाही पुर्नविचारासाठी बोर्डावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या खटल्याशी संबंधीत काही मंडळींनी आ,चरणभाऊ वाघमारे यांच्याशी विचार विनिमय सुरू केला असून नजिकच्या काही दिवसात साबांतील भ्रष्टाचारी जुनी मढी उकरले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने या खटल्यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले,खटल्यात साक्ष फिरवणारे यांच्यासह अन्य भ्रष्टाचारी मंडळींचे धाबे दणाणले आहे.
बाक्सः1

*अशोक सोनवणे यांना एसीबीचे बोलावणेसाबांत सुरू असलेल्या मालप्रक्टीस संदर्भात सन 2002 ते सन 2014 या कालावधीत अनेक तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.अशोक सोनवणे यांनी ज्या शाखा अभियंत्याविरूद्ध अशा प्रकारचे तक्रार अर्ज दाखल केले होते,त्या तक्रार अर्जांचा तपास प्रगतीपथावर असून एसीबीने अशोक सोनवणे यांना जबाबासाठी पाचारण केले.

दृष्टीक्षेपातील प्रकरणे
*निवृत्त सार्वजनिक सचिव व राज्य माहिती आयुक्त ,औरंगाबाद स्व.विजय बोरगे आणि निवृत्त साबां सचिव व राज्य माहिती आयुक्त स्व.माणेक शाह यांच्या कार्यकाळात साबांतील गैरव्यवहारासंदर्भात झालेले तक्रार अर्ज,या तक्रार अर्जावर या तत्कालीन सचिवांनी घेतलेली भुमिका आणि त्या संदर्भातील एकूण पञव्यवहार
*निवृत्त साबां सचिव धनंजय धवड आणि विद्यमान मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या कार्यकाळातील प्रकरणे
*सन 2015-16 या आर्थिक वर्षात औरंगाबाद साबांत निविदांमध्ये झालेला घोळ,जुनी देयके अदा करण्याचा प्रताप
*पुणे साबां एकात्मिक मध्ये सन2012-13 व सन 2013-14 या आर्थिक वर्षात मुख्य अभियंता एकनाथ उगीले यांच्या कार्यकाळात झालेले गैरव्यवहार,निविदांमध्ये झालेला घोळ आणि याविषयी ना.विजय शिवतारे व पुरंदरचे आमदार यांनी केलेली तक्रार.