Breaking News

भिडे प्रवृत्तींने पछाडल्याने ओबीसी दलितांना मारले जाते - अ‍ॅड.आंबेडकर

अहमदनगर /प्रतिनिधी :- हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणार्‍या शक्ती अनियंत्रित हिंदू संघटनांच्या घातपाती कारवायांना समर्थन देत असल्यामुळे ओबीसी दलित समाजाला मारले जात आहे. करनी सेना हे अनियंत्रित हिंदू शक्तीचे द्योतक असून भिडे प्रवृत्तीने या मंडळींना पछाडल्याचा दाखला त्यांची आक्रमक देहबोली देत असल्याचा आरोप भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. प्रकाश आंबेडकर यांनी केला. पत्रकारांशी वार्तालाप करतांना मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षपातीपणावर सडकून टिका करतांना अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भिमागोरेगाव प्रकरणात दलितांचे कोम्बींग करणार्‍या शासनाने करणी सेनेच्या दहशतवाद्यांचे कोम्बींग करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हानही मुख्यमंत्र्यांना दिले.

सध्याची सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. देशात हिंदू संघटनांमध्येच भांडणे सुरू असून सध्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. देशात हिंदु संघटनामध्ये नियंत्रित हिंदू संघटना व दुसरी अनियंत्रित हिंदू संघटना कार्यरत असून नियंत्रित हिंदू संघटना लोकांच्या बोलण्याला थोडे तरी महत्व देतात, परंतु अनियंत्रित हिंदू संघटना बेभान झाल्या आहेत. भिमा कोरेगाव च्या घटनेत हिंदु ओबीसींना व दलितांना अनियंत्रित संघटनांनी मारले आहे. देशात व राज्यात परिवर्तनसासाठी राजकिय चारित्र्याची गरज आहे. अशी प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी येथील शासकिय विश्राम गृहावर पत्रकार परिषदेत केले. नगर जिल्हा दौर्‍यावर नुकतेच आले असतांना त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारपरिषेत त्यांच्या समवेत भारिपचे राज्य प्रवक्ते वसंत साळवे, भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, अ‍ॅड. अरूण जाधव, बाबा आरगडे, सुजय म्हस्के, अ‍ॅड. भानुदास होले, संध्याताई मेढे, सुनिल शिंदे, दिलीप साळवे, वाघमोडे सर आदि उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, करणी सेना म्हणजे अनियंत्रित हिंदू संघटनेचे प्रतिक आहे. भिमा कोरेगाव च्या घटनेनंतर आम्ही 3 जानेवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोंम्बींग ऑपरेशन करत महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आत मध्ये ठेवले, कायदयाने चालणारा ,पोलीसांना मानणार्‍या वर्गाबदल दडपशाहीचे धोरण अवलंबिले जात आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना धमकी देणार्‍याबद्दल साधा एफआयआरही नाही. मुख्यमंत्र्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी करणी सेनेच्या विरोधात कोम्बींग ऑपरेशन करून दाखवावे. धार्मिक राजकारण करीत असतांना आपले मत मांडण्याचा अधिकार नाही हे लोकशाहीच्या विरोधात आहे. भिमा कोरेगावच्या मुद्दयावर मुख्यमंत्र्यांनी काही निवृत्त न्यायाधीश व आमच्याशी चर्चा करावी. संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना पंतप्रधान कार्यालयाकडून वाचविले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जी भिंडेची प्रवृत्त्ती आहे, तीच करणी सेनेची प्रवृत्ती आहे. 

हिच प्रवृत्ती सवर्ण हिंदूच्या घरापर्यंत पोहचली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. धार्मिक राजकारण हे अनियंत्रित संघटनांकडून होणार असेल तर त्याची झळ सवर्ण हिंदू पर्यंत पोहचेल. बीजेपी ने सत्त्तेमध्ये येईपर्यंत कधी संविधानाची चर्चा केली नाही. याचाचा अर्थ सत्तेत आल्यावरच संविधानाबद्दल आस्था बाळगणे चुकीचे आहे. जिग्नेश मेवाणी व कन्हैयाकुमार यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील पुरोगामी आंबेडकरी जनता नाही. धार्मिक विचार मांडण्याची ताकद केवळ महाराष्ट्राच्या विचारवंतांमध्येच असल्याचे यावेळी ते म्हणाले. रिपब्लिकन ऐक्याबाबत बोलतांना ते म्हणाले हे वेगवेगळया राजकिय टोळयाचे ऐक्य आहे. व हे ऐक्य मी मानत नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन राज्याला व देशाच्या राजकारणाला हालविण्याची ताकद भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत भारिप बहुजन महासंघाचे राज्य प्रवक्ते वसंत साळवे हे उपस्थित होते.