Breaking News

ठिकाण कळू नये म्हणून चोरट्यांनी वापरले 15 मोबाईल फोन्स

जळगाव, दि. 04, जानेवारी - जळगाव शहर व जिल्ह्यातून 11 ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या चौघं चोरटयांनी लपून बसलेल्या ठिकाणीची माहिती कळू नये यासाठी 20 दिवसात तब्बल 15 मोबाईल वापरले. हे सर्वच मोबाईल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.


दरम्यान, पोलीस कोठडीचा हक्क राखून अटकेतील तिन्ही चोरटयांची आज कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेंगोळा (ता.जामनेर) यात्रेत अमाप पैशांची उधळपट्टी क रताना रडारवर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करण प्रल्हाद मोहीते (वय 20 मुळ रा.तरवाळे, ता.चाळीसगाव), दीपक रेवाराम बेलदार (वय 19, मुळ रा.खडक ी-बोरगाव, ता.बोदवड) व दिनेश गजेंद्र मोहीते (वय 19 मुळ रा. तळेगाव, ता. जामनेर) तिन्ही ह.मु.पिपरीया, ता.वापी, जि.बलसाड, गुजरात यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.