Breaking News

अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला बंगळुरुमध्ये अटक

पालघर, दि. 27, जानेवारी - वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बंगळुरू येथून तब्बल 27 दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 सप्टेंबर 2017 रोजी वसईत तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 21 लाख 70 हजार रुपये किंमतीचे ईपीड्रीन नावाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. एका नायजेरीयनसह तीन इसम सदर अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. अंमली पदार्थाचा साठा आलिशान ऑडी गाडीतून नेला जात होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.