Breaking News

कुळधरणला महिला मेळावा,आरोग्य शिबीर संपन्न


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या वतीने महिला मेळावा,आरोग्य शिबीर आणि हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.नूतन मराठी विद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमा सोबतच महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबु-चमचा स्पर्धा घेण्यात आल्याने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. स्पर्धेतील यशस्वी महिलांना साडी, पर्स, मोबाईल पाऊच अशा भेटवस्तू देण्यात आल्या. मंजुषा गुंड यांनी महिलांचे स्वागत केले. भामाबाई राऊत, नगरसेविका उषाताई मेहेत्रे, पंचायत समिती सदस्या साधना कदम, कोपर्डीच्या सरपंच रोहिणी सुद्रिक, आशालता जंजिरे,शिल्पा मोढळे, डॉ.बी.टी.सोनवणे, डॉ.शिल्पा सुद्रिक, डॉ.वंदना शिंदे, माजी सरपंच मीनाताई गुंड आदी महिलांची उपस्थिती होती. आयोजनात मंजुषा गुंड यांच्यासह वंदना गुंड, मनीषा गुंड, भारती गुंड यांनी सक्रिय सहभाग घेतला. गेल्या अनेक वर्षांपासुन गुंड कुटुंबियांकडुन कुळधरण येथे या उपक्रमाचे आयोजन केले जाते. 

ग्रामीण भागातील महिलांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याने महिलांसाठी ही एक पर्वणी ठरत आहे. महिलांसह मुलींनीही या कार्यक्रमाचा आनंद घेतला. आजबे गल्ली, सिध्दार्थनगर, रोहिदासनगर, आण्णाभाऊ साठेनगर, बागाचा मळा, गुंड वस्ती अशा अनेक ठिकाणच्या सुपेकर, जगताप, गुंड, गजरमल, भवाळ, बोबडे, शिंदे आदी कुटूंबातील महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा नेते ओंकार गुंड यांनी विशेष परिश्रम घेतले. शरद जगताप यांनी निवेदन केले.