Breaking News

हुरडा पार्टीत मान्यवरांची उपस्थिती


कुळधरण/प्रतिनिधी/- आ.अरुणकाका जगताप यांच्याकडुन बनपिंपरी येथे आयोजित हुरडा पार्टीसाठी जिल्ह्याच्या विविध भागातुन नेते, कार्यकर्ते, महिला यांची उपस्थिती होती. कर्जत तालुक्यातील अनेक मान्यवरांनी देखील हजेरी लावली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, सुधीर जगताप आदी हजर होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवरांनी हुरड्यासह भोजनाचा आस्वाद घेतला. आ. संग्राम जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.