खडतर परिस्थितीतही निश्चित केलेल्या ध्येयाचा पाठलाग करा -दत्तू भोकनळ
नाशिक, - खडतर परिस्थितीत स्वतःला खंबीर ठेऊन आपण निश्चित केलेल्या ध्येयाचा पाठलाग करा,त्यासाठी योग्य दिशा ठरवून नियमित सराव व आत्मविश्वासाने यश संपादन करा असे विचार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू दत्तू भोकनळ यांनी 5 व्या राष्ट्रीय व 10 व्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात व्यक्त केले. दत्तू भोकनळ यांनी यावेळी आपला जिवनप्रवास सांगतांना नाशिकमध्ये खेळाचे वातावरण अत्यंत चांगले तयार होत असून त्यामध्ये मविप्र संस्थेचा मोठा हातभार असून कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी स्वतःला आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन मेहनत करण्याची तयारी ठेवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी 17 वेगवेगळ्या गटात विजेत्या खेळाडुंना एकुण 7 लाख 23 हजार इतक्या रकमेची रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच मविप्र उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजन समितीचे कौतुक करतांना संस्थेचे क्रीडा संचालक , पंच , एन सी सी स्वयंसेवक , एन एस एस , असे एकुण 1500 पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत असल्याची माहिती दिली . मॅरेथॉन स्पर्धा अधिक तांत्रिक व शास्रशुद्ध पद्धतीने होत आहे व नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे ही संस्थेसाठी भूषणाव बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महापौर रंजना मानसी यांनी मविप्र मॅरेथॉन हा नाशिक शहराच्या नावलौकिकात भर टाकणारा दर्जेदार उपक्रम असून त्या स्पर्धेसाठी महानगर पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात मविप्र मॅरेथॉन ही राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होत असून पुढे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ती पोहचेल असा विश्वास व्यक्त करतांना दत्तू भोकनळ यांच्यासारखे खडतर परिस्थितीतून यशाला गवसणी घाला असे आवाहन के ले.