राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.विधाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते अरुणोदय गो शाळेस चारा वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.विधाते, संजय झिंजे, कुमारसिंह वाकळे, अभिजीत खोसे, अमित खामकर, साहेबान जहागीरदार, गजेंद्र भांडवलकर, वैभव ढाकणे, गहिनीनाथ (दादा) दरेकर, प्रकाश भागानगरे, अरुण खिची आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, अनेक विद्यार्थी प्रा.विधाते यांनी घडविले असून, अशा गुरुंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देवून, त्यांची पक्षामध्ये वाटचाल सुरु आहे. युवा कार्यकर्ते पासून तर सुज्ञ व बुध्दीजीवी वर्ग प्रा.विधाते यांनी पक्षाशी जोडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रा.माणिक विधाते यांनी शहरात गो सेवेसाठी सुरु करण्यात आलेली अरुणोदय गो शाळा उत्तम रित्या चालविली जात असून, याला मदत करण्याचे आवाहन केले. तसेच विविध सामाजिक उपक्रम आ.अरुणकाका जगताप यांच्या प्रेरणेने राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.