Breaking News

अवैध सर्व्हीस सेंटरमध्ये सरकारी वाहनांची धुलाई

ठाणे - बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी अवैध कार सर्व्हिस सेंटर सुरु असून या सेंटरमध्ये पोलीस देखील त्यांच्या सरकारी गाड्या धुवून घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाकडून पाणी माफियांवर अद्याप कोणतीही कारवाई केली जात नाही हे दिसून आले. बदलापूर पाईपलाईन रोडला काटई ते अंबरनाथपर्यंत कार सर्व्हीस सेंटर, ढाबे, हॉटेल यांचे मोठे जाळे पसरले आहे. एमआयडीसीच्या पाईपलाईनला छिद्र पाडून त्यातून चोरून नळ जोडण्या केल्या जात आहेत.