Breaking News

नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांसाठी नि:शुल्क मुलाखत प्रशिक्षण


मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2017 मध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत (एसआयएसी) नि:शुल्क मुलाखत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या नि:शुल्क मुलाखत प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. म.बा. भिडे यांनी केले आहे.

नि:शुल्क मुलाखत प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी येत्या 18 जानेवारीपर्यंत आपले अर्जsiac1915@gmail.com वर करणे असून मुलाखत प्रशिक्षण नोंदणी www.siac.org.in या संकेतस्थळावरील नोंदणी अर्ज करुन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना माहितीसाठी 022-22070942 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.