Breaking News

स्वच्छता विभागाच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयीन गटात अलिशा जॅकी फेराव (ता. कुडाळ) हिने तर कनिष्ठ महा विद्यालयीन गटात चैतन्या चंद्रकांत सावंत (ता. सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही विद्यार्थिनी राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत जिल्हयाचे प्रति निधीत्व करणार आहेत.


पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.