Breaking News

तिलारी घाट रस्त्याच काम युद्धपातळीवर

सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - तिलारी घाटरस्त्याच काम अंतिम टप्प्यात आल आहे. सध्या हॉट मिक्सिंग डांबरीकरण युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे जानेवारीअखेर क ोल्हापूर, बेळगाव कडे जाणार्‍या गोवा आणि दोडामार्ग तालुक्यातील प्रवाशांसाठी तिलारी घाटरस्ता खुला होणार आहे.


दोडामार्ग बेळगाव मार्गावरील तिलारी घाट तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने तिलारीनगर इथून तिलारीघाटाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत निर्मिती केंद्राकडे जाण्यासाठी बनवला होता. तो खासगी असल्याने जीव मुठीत घेवून वाहनचालक वाहने हाकायचे. घाटात अनेक अपघात झाले. वाहनांचे नुकसान आणि प्राणहानीही झाली. सुमारे सात किलोमीटरचा रस्ता तीव्र वळण आणि चढ उतारांचा आहे. तो मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत होती. मधल्या काळात बीओटी तत्वावर रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करून टोल उभारण्याचा प्रस्तावही पुढे आला. पण तो ठेकेदाराला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्यान तो मागे पडला. त्यानंतर वाहनांची वाढती वर्दळ, अपघातांची वाढती संख्या आणि रस्त्याची निकड लक्षात घेऊन तिलारी पाटबंधारे विभागाने कोल्हापूर बांधकाम विभागाकडे साडेतीन कोटी रूपये वर्ग केले आणि महिनाभरापूर्वी तिलारी घाटरस्त्याच मजबुतीकरण आणि डांबरीकरण सुरु झाले.