Breaking News

दिल्लीतील आंदोलनात ११ टक्के घट .


नवी दिल्ली : देशाच्या सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर राजधानी दिल्लीत होणाऱ्या एकूण विरोधी आंदोलनात गतवर्षी ११ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. २०१७ मध्ये अशा प्रकारची एकूण ९,५४६ आंदोलने पाहायला मिळाली. २०१६ मध्ये ही संख्या १०,७८४ इतकी होती. दिल्ली पोलिसांच्या अहवालानुसार देशभरातील संस्था आणि संघटना राजकीय, सामाजिक, कामगार, युवक आणि विद्यार्थी यासारख्या मुद्द्यांना पकडून राजधानीमध्ये मोठ्या संख्येने आंदोलन करतात.