Breaking News

युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे ती जागृत झाली तर उद्याचे भविष्य दूर नाही.


पाथर्डी /प्रतिनिधी/- ,युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे ती जागृत झाली तर उद्याचे भविष्य दूर नाही.असे वक्तव्य जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 'राष्ट्रीय युवा दिना' निमित्त पाथर्डी तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी भगवान इन्स्टिट्यूट रुरल डीव्हलेपमेंट (बर्ड) यांचा वतीने १० जानेवारी ते १२ जानेवारी अशा तीन दिवशीय 'प्रेरणा २०१८' या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध मान्यवराना नागरिकाबरोबर संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युवा शक्ती :राष्ट्रभक्ती या विषयावर संवाद साधला. 
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बोलताना म्हटले की , जपान सारख्या देशाला तरुणांनी उभं केलं. इंडोनेशियाची क्रांती तरुणानी केली. मी २५ वर्षाचा तरुण असताना विचार करायचो. त्यावेळी लक्ष्यात आलं की, सगळे नुसतं एकमेकांशी स्पर्धा करून पळत आहेत. माणूस जन्माला येताना काही घेऊन येत नाही व जाताना ही काही घेऊन जात नाही मग पळतो का? याच उत्तर सापडलं नाही. तसेच आईच्या संस्कारानी सामजिक बांधिलकीची जाणीव होत होती. ज्या देशासाठी अनेकानीं बलिदान दिले. त्या देशाची अशी अवस्था पाहून का जगायचं? म्हणून वयांचा २५ व्या वर्षी आत्महत्या करायची असा विचार आला. त्यानंतर दिल्लीच्या स्टेशनवरती बुक स्टॉलवरती स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक वाचले. त्यावेळी जीवनाचा धागा हाताशी आला. स्वामी विवेकानंद आणखी वाचत गेलो तेव्हा जीवनाचा कोड सूटत गेलं. त्यातून एक गोष्ट कळाली की ईश्वराने माणसाला जन्म सेवा करण्यासाठी दिला आहे. जसं चार भिंतीच्या आत एक मंदिर, एक मूर्ती तिची पूजा तसेच गाव व राष्ट्र हे एक मंदिर आहे. जनता ही सर्वसार आहे या जनतेची निस्वार्थ सेवा करणे म्हणजे पूजा आहे. हे मला स्वामी विवेकानंदाच्या पुस्तकातून कळत गेलं. दाण्याचा कण बना, पिठासारखे संपून जाऊ नका. प्रपंच करा पण प्रपंच चार भीतीचा न करता मोठा करा. जीवनात पाच गोष्टीं आचरणात आणा. लखपती बनून तर समाजकारण करून आनंद मिळतो. राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांना विसरू नका. युवकांनी संसारात राहून देशसेवा करावी, कुणाचे चांगले करता आले नाही तर निदान वाईट तरी करू नका, जीवनाचा खरा आनंद बाहेरच्या नाशवंत जगात नसून आंतर मनातून केलेल्या त्यागात आहे. अपमान गिळायला शिका समोरच्याला शब्दातुन नाही तर कृतीतून उत्तर द्या, समाजसेवा करण्यातच जीवनाचा उद्धार असल्याचे समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दिपक देशमुख, नगराध्यक्ष डॉ.मृत्यृंजय गर्जे, डॉ.शिरीष जोशी, डॉ.संदीप पवार, राजेश काळे, डॉ.भाऊसाहेब लांडे, डॉ ऋषीकेश कुलकर्णी, मनोज गोल्हार, भाऊसाहेब वाघमोडे, विजय पवार, संजय पठाडे, मेजर पवार यांनी परिश्रम घेतले. तर या तीन दिवशीय कार्यक्रमासाठी पाथर्डीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत मोठा जनसमुदाय उपस्थित होता