दुर्बल गरजूंपर्यंत योजनांची माहिती पोहचणे गरजेचे- न्या. सूर्यकांत शिंदे
विधी सेवा शिबिर व शासकिय योजनांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिंदे म्हणाले की, शासन राबवत असलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी शासनाच्या अधिकारी कर्मचार्यांनी त्यांच्या अडचणी समजावून घ्यावी व त्यांना मार्गदर्शन करावे. एकाच ठिकाणी माहिती मिळत असल्यामुळे त्याचा उपयोग गरजू दुर्बल लोकांपर्यत पोहोचण्यास होईल असे ते म्हणाले.
डॉ. सिंगल म्हणाले, ग्रामीण भागातील गरीबांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती कोठे मिळेल हे माहित नसल्यामुळे प्रयत्न करुन देखील ती मिळत नाही व त्यापासून वंचित राहावे लागते. मेळाव्याचा त्यांना फायदा होईल. ही माहिती अनेकांपर्यत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.