Breaking News

महिलांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी - अ‍ॅड.माधवी नाईक

नाशिक, - भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र आणि राज्य सरकारांनी दीनदुबळ्यांच्या आणि विशेषतः महिलांच्या विकासासाठी मुद्रासह विविध प्रकारच्या योजना हाती घेतल्या असून त्याचा लाभ घेऊन महिलांनी आपला विकास साधावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.माधवी नाईक यांनी केले.


भाजपा नाशिक महानगर महिला आघाडीतर्फे सातपूर येथील सौभाग्य मंगल कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.भारतीय जनता पार्टीत महिलांचा आदर बाळगला जातो. महिलांना विविध महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधीही दिली जाते.पुरुषांच्या बरोबरीने आज महिलाही सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. सत्तेत महिलांना योग्य वाटा मिळावा यासाठी आम्ही सतत आग्रही असतो. महिलांचे विविध प्रश्‍न मांडून ते सोडविण्याकडे आमचा सातत्याने कल राहिलेला आहे. राजकारणाच्या क्षेत्रातही आज महिलांचा बोलबाला आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती साधली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारांनी महिलांच्या सबलीकरणासाठीं विविध उपक्रम हाती घेतले असून त्याद्वारे महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे असेही माधवी नाईक यांनी आपल्या भाषणात पुढे नमूद केले.