50 किमीच्या मिनी पेलेटॉन स्पर्धेत प्रांजल पाटोळे महिलांत प्रथम
नाशिक, - नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित जायंट स्टारकेन ’नाशिक पेलेटॉन 2018’ स्पर्धेत 150किलोमीटरच्या पुरुषांच्या 40वर्षाखालील आणि 40 हून अधिक अशा दोनही वयोगटात नाशिकच्या संघाला विजेतेपद मिळाले. नाशिक पेलेटॉनच्या इतिहासात प्रथमच नाशिकच्या संघांना विजेतेपद मिळाले असून खुल्या गटात (40 वर्षाखालील) अरुण भोये, गोपीनाथ मुंडे, उत्कर्ष जाधव यांच्या संघाने 5 तास 13 मिनिट 37 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. मागीलवर्षी याच संघातील 2 जणांचा समावेश असलेल्या संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. नाशिकच्या सटाणा सारख्या शहरातून आलेल्या या मुलांचे विजेतेपद कौतुकाचा विषय ठरले. याच गटात जायंट स्टारकेन पुणेच्या भीम रोकाया, विठ्ठल भोसले, विवेक वायकर या संघाने द्वितीय आणि नगर आणि सांगली शहरातील सायकलपटूंचा समावेश असलेल्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
40 वर्षावरील पुरुषांच्या गटात हिरामण अहिरे, नितीनढाके आणि प्रशांत तिडके यांच्या नाशिकच्या संघाने 5 तास 46 मिनिट 26 सेकंदात स्पर्धा पूर्ण करत विजेतेपद मिळवले. पुणे आणि मुंबईच्या संघांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले. दोन प्रकारच्या वयोगटात खेळण्यात आलेल्या या स्पर्धेत एका संघात तीन सायकलपटूचा समावेश होता. विजेत्या सर्व सायकलपटूना राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दोन सायकलपटूना झालेल्या कि रकोळ अपघात वगळता स्पर्धा उत्साहात पार पडली.
40 वर्षाखालील खुल्या गटातील विजेत्या नाशिकच्या संघातील गोपीनाथ मुंडे याने 28 मिनिट 20 सेकंदात 7.5 किमी लांबीचा अंबोली घाट पार करत मनाचा ‘ घाटाचा राजा ’ हा किताब पटकावला. प्रथम क्रमांकाने विजेत्या संघांना 31 हजाराचे रोख बक्षीस तर प्रत्येकी 69 हजार रुपये किमतीच्या तीन सायकल्स बक्षीस देण्यात आल्या. तर द्वितीय क्रमांकांना प्रत्येकी 21 हजार रोख आणि रुपये 30 हजार किमतीच्या तीन सायकल्स आणि तृतीय क्रमांकाला रुपये 11 हजार रोख अधिक रुपये 25 हजार किमतीच्या तीन सायकल्स अशा स्वरुपात बक्षिसे देण्यात आले. तसेच शनिवारी 15 आणि 50 किमीच्या एकूण सहा गटांत मिनी पेलेटॉन स्पर्धा पार पडल्या. 50 किमीच्या स्पर्धेत 40 वर्षाखालील महिलांच्या गटात प्रांजल पाटोळे हिने बाजी मारली तर पुरुषांत जीहान पांजवानी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर 40 वर्षावरील गटात महिलांत डॉ. मनीषा रौदळ तर पुरुषांत निगल स्मिथ यांनी बाजी मारली.