Breaking News

लोणीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांचे उदघाटन


प्रवरानगर क्रीडा स्पर्धांच्या माध्यमांतुन सांघिक भावना निर्माण होतानाच विद्यार्थिनींनी आता जास्त संख्येने विविध क्रीडाप्रकारात देशाचे नेतृत्व करण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन ब्रिलियंट बर्ड्स स्कूलच्या संचालिका धनश्रीताई विखे यांनी लोणी येथिल पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन मध्ये आयोजित केलेल्या मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धांच्या उदघाटन करताना केले. विविध जिल्ह्यातील तंत्रनिकेतन मधील सुमारे सहाशे विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे लोणी येथिल पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतन मध्ये डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट असोशिएशन पुणे यांच्या वतीने राज्यातील विविध पॉलीटेकनिक मधील महिला खेळाडूंच्या राज्यस्तरिय स्पर्धा मध्ये नाशिक,धुळे,औरंगाबाद,जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, जालना आदी जिल्यामधील तंत्रानिकेतन मधील सुमारे सहाशे महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत. लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयांच्या मैदानावर कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, बास्केटबॉल, रनिंग आदी मैदानी खेळ बरोबरच बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारात या स्पर्धा होत आहेत. धनश्रीताई विखे यांच्या हस्ते झालेल्या या उदघाटन कार्यक्रमासाठी अहमदनगर शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. एम. एस सातारकर, पुणे क्रीडा विभागाचे संचालक प्रा. संजय हरिप,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ. यशवंत खर्डे, सुद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जयंत धर्माधिकारी, क्रीडा संचालक सीताराम वरखड,प्रा.बाळासाहेब विखे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य मनोज परजने यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलताना विखे म्हणाल्या , जय पराजयाचा विचार ना करता मुलींनी क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी झाले पाहिजे, प्रवरा मध्ये खेळांच्या सर्व सुविधा उपलब्ध असून, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातील अनेक खेळाडू राज्य ,राष्ट्रीय आणि अंतर राष्टीय पातळीवरयशस्वी कामगिरी करीत असल्याचे निदर्शनास आणताना चांगला खेळ करतानाच अनेक मैत्रिणी मिळवून जाण्याचा सल्ला त्यांनी राज्यातून आलेल्या महिला खेळाडूंना दिला. प्रा. संजय हरिप म्हणाले कि, प्रवरानगर येथिल स्पर्धेत विनर आणि रनर होणारे खेळाडूना तासगाव येथे राज्यपातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी संधी मिळणार असून मुलींच्या विभागीय स्पर्धांच्या आयोजनाचे अध्यक्षपदी प्राचार्य मनोज पराजाने यांची निवड करण्यास इच्छुक असल्याचे सांगताना असोशियनच्या माध्यमातून खेळण्याऱ्या खेळाडूंसाठी हि २ टक्के आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. एम. एस सातारकर,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.