Breaking News

न्यायालय परिसरात गोळीबार.


शिकर : राजस्थानच्या चिरू जिल्ह्यातील एका न्यायालयात बुधवारी विचाराधीन कैद्याला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरंानी केलेल्या गोळीबारात एका वकिलासह ३ जण जखमी झाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास सादूलपूर येथील स्थानिक न्यायालयात अजय जैतपुरा नावाच्या विचाराधीन कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी झाल्यानंतर जैतपुरा न्यायालयातून जात असताना ३ त ४ हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात जैतपुरा, वकील रतन लाल व आणखी एक व्यक्ती जखमी झाला.