ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 च्या स्लाईडिंगला जाणार्या लोकलच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 1 ते 2 च्या सुमारास ही घटना घडली आहे. लोकलच्या डबा क्रमांक 2010 बी मोटर कोचला ही आग लागली होती. या आगीत हा डबा जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र लोकलचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 2 पाण्याचे बंबच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. अथक प्रयत्नाने ही आग थांबवण्यात आली आहे.
ठाणे स्थानकावरील लोकल आग; जीवितहानी नाही
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:58
Rating: 5