Breaking News

अभिवादनासाठी भीमसैनिकांची अलोट गर्दी


औरंगाबाद : नामांतर दिनाच्या औचित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटसमोर भीमसैनिकांनी गर्दी केली आहे. नामांतर शहीदांच्या स्तंभाला आणि गेटसमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी भीमसैनिक एकत्र जमले आहेत. 14 जानेवारी या नामांतर दिनाचे औचित्य साधून हजारो भीमसैनिक औरंगाबादेत येत असतात. मात्र, यावर्षी कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कडक फौजफाटा तैनात केला आहे. नामांतर दिनी ’एक विचार एक मंच’ ही संकल्पना राबवण्यात आल्यामुळे अत्यंत शांततेच्या वातावरणात नामांतर दिन साजरा होत आहे.