Breaking News

अण्विक अस्त्रे असल्याची पाकची धमकी


भारताकडून येणार्‍या कोणत्याही धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी पाकिस्तानकडे अण्विक अस्त्रे आहेत. त्यामुळे भारताने असे कोणतेही धाडस करु नये अशा प्रकारची धमकीच पाकच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली आहे. गफूर पुढे म्हणाले की, ‘आमच्याकडे सक्षम लष्करी दल आहे. आम्ही एक जबाबदार आणि लवचिक अण्विक राष्ट्र आहे. याची भारताने नोंद घ्यावी. भारताने काही कुरापती केल्यास आम्ही गप्प बसू अशा भ्रमात राहू नये’ अशी धमकी दिली आहे.