नद्या प्रदूषित करणार्यांवर कडक कारवाई करा - रामदास कदम
श्री. कदम म्हणाले, मिठी नदीतील कचर्यामुळे दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यासाठी नद्यांमध्ये सांडपाणी सोडणारे, कचरा घाण टाकणारे, अनधिकृत झोपड्या उभ्या करणार्या विरुद्ध कडक कारवाई करावी. त्यांना नोटीसा द्याव्यात असे निर्देश प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकार्यांना दिले.
