नगरपंचायत कर्मचाऱ्याकडून जिजाऊ जयंती साजरी.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलभुषण शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, व सतरा नगरसेवक यापैकी एकालाही जिजाऊंना अभिवादन करण्यास वेळ न मिळाल्याने पर्यायाने नगरपंचायतच्या कर्मचारी वर्गाने अभिवादन केले. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन पारनेर तालुक्यात शिवसेना बहुमतात सत्तेवर आली. पण राजमाता जिजाऊंना अभिवादन कऱण्यास नगरपंचायतच्या प्रशासकिय अधिकारी ,विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना अभिवादन करण्यास वेळ न मिळाल्याने शहरामध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे
