Breaking News

तिहेरी तलाकविरोधात लढणार्‍या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश

हावडा : तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्‍चिम बंगालमधील हावडाच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयातील महिला मोर्चाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गावती सिंह यांनी तिचं पक्षात स्वागत केलं.

यावेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच तिहेरी तलाकसाठी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही तिने आभार मानले. पश्‍चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी इशरत जहाँ यांना मिठाई भरवून त्यांचं पक्षात स्वागत केलं.