Breaking News

भीमा-कोरेगाव परिसरात दगडफेक व गाड्यांची तोडफोड पोलिसांकडून परिस्थिती नियत्रंणात.

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील परिसरात अज्ञांताकडून गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यात 40 हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे दिवसभर तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र, तेथे सीआरएफच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सध्या स्थितीवर पूर्ण नियंत्रणात परिस्थिती निवळली आहे. दरम्यान, वढू बुद्रुक येथे नामफलकावरून दोन गटातील वादावरून दगडफेकीची घटना घडल्याचे समोर येत आहे. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत. तेथून जवळच असलेल्या भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांचा शौर्य दिन कार्यक्रम आज साजरा होत आहे. त्यामुळे या दगडफेक घटनेकडे भीमा कोरेगावची तर पार्श्‍वभूमी नाही ना हे तपासले जात आहे.


भीमा कोरेगाव येथील विजयस्तभांला अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने आंबेडकरी अनुयाय येत असतात. मात्र काही समाजकंटकांनी या अनुयांयाच्या गाडयांवर दगडफेक केली, तर काही ठिकाणी गाडया पेटवून देणयाचे प्रकार देखील घडले. दगडफेक व गाडयांची तोडफोड केल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र पोलिस आणि राज्य राखीव दलाचे जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तणाव असलेला भागात बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी कुठलेही वाहन जावू दिले जात नव्हते. मोठा फौजफाटा या भागात आता तैनात झाला असून पोलीसांनी या मार्गावर जाणार्‍या खासगी आणि सरकारी सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यास सुरुवात केल्यामुळे परिस्थिती नियत्रंणात आला. लोकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे. 

कोरेगाव भीमा येथे दंगल सदृश्य परिस्थिती असून येथील असंख्य गाड्यांची, घरांची व दुकानांची तोडफोड करून काही गाड्या पेटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थांनी सकाळ पासून आपापली दुकाने बंद ठेवली होती. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. आज अखेर गावात मोठ्या प्रमाणात दंगल झाली असून गावातील असंख्य घरांचे व दुकानांचे फलकाची तोडफोड करण्यात आली.तसेच घराच्या समोर लावण्यात आलेल्या गाड्या फोडून त्या पुणे नगर रस्त्यावर पेटविण्यात आल्या आहेत. सध्या गावात पोलीस, सीआरपीएफ चे जवान, दंगल नियंत्रण करणारे पोलीस आहेत. मोबाइल चे नेटवर्क बर्‍याच प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. देशभरातील दलित समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे आज शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. आज या घटनेला 200 वर्ष पुर्ण झाल्याने व्दिशताब्दी महोत्सवासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय भीमा कोरेगाव येथे दाखल झाला आहे.


भीमा कोरेगाव येथील परिसरात काही समाजकंटकांनी कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे येथील आंबेडकरी अनुयांयाच्या गाडयांवर दगडफेक करीत, जाळपोळ केल्यामुळे कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे भागात तणाव निर्माण झाला होता.