Breaking News

आणुबॉम्बचे बटण माझ्या हातात : किम जोंग

नवी दिल्ली : उत्तर कोरिया आता अण्वस्त्र संपन्न देश झाला आहे हे वास्तव आहे आणि त्या आणुबॉम्बचे बटण माझ्या हाती आहे,असे म्हणत उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने अमेरिकेला इशारा दिला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने अमेरिकेला धमकी दिली आहे. 

किमच्या मते, अमेरिका आता उत्तर कोरियाविरोधात कधीच युद्ध पुकारणार नाही. आम्ही अमेरिकेच्या सर्वच भागांवर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता विकसित केली आहे. दरम्यान, त्यांनी दक्षिण कोरियाशी आपण चर्चेस तयार असल्याचेही म्हटले. चर्चेच्या माध्यमातून एकमेकांमधील तणाव दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिम्पकिमध्ये उत्तर कोरियाचे खेळाडू पाठवण्याबाबत किम म्हणाले की, दोन्ही कोरियाचे अधिकारी लवकरच एकमेकांना भेटतील आणि यावर विचार करतील. या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.