औरंगाबाद : पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
औरंगाबाद :- पत्नीची हत्या करून पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक औरंगाबादमध्ये घटना घडली आहे. आज शनिवारी सक ाळी सात वाजेच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात ही घटना घडली आहे. प्रवीण प्रभाकर पाटील (32) आणि आरती प्रवीण पाटील असे मृत दाम्पत्याचे नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
प्रवीण हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. तर, आरती ही गृहीणी होती. या दोघांना 9वर्ष आणि दीड वर्षाची दोन मुले आहेत. प्रवीण अधूनमधून मद्य प्राशन करीत होता. त्यामुळे हे दोघे सतत भांडण करत होते. तीन दिवसापूर्वी प्रवीण पुन्हा मद्य प्राशन करून आला होता. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरती रागाच्या भरात दोन मुलांसह माहेरी राहण्यास गेली. पुन्हा मद्य न पिण्याचे वचन प्रवीणने पत्नी आणि सासूसासरे यांना दिले. यानंतर मध्यरात्री 12 च्या सुमारास आरती दोन मुलांना सोबत घेऊन प्रवीणसोबत घरी गेली. मध्यरात्रीनंतर प्रवीणने आरतीचा गळा आवळून खून केला. तर, त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.