पुणे, अमेरिकन नागरिक वापरत असलेल्या अॅपल आणि आयपॉडमध्ये व्हायरस घुसल्याचे सांगून त्यांना गंडा घालणा-या बनावट कॉल सेंटरचा पुणे पो लिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून आरोपींनी मागील चार महिन्यात 175 अमेरिकन नागरिकांची दहा लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहित रामलाल माथूर (वय-29, रा.बावधन) आणय सदानंद काळे (वय-29, रा.खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर आरोपींचा अन्य एक साथीदार कुणाल फतवाणी फरार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात व्हि.टेक नावाने सुरू असलेल्या का ॅल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने छापा टाकून वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून 6 हार्डडिस्क, 1 लॅपटॉप, हेडसेट, राऊटर आदी साहित्य जप्त केले.
अमेरिकन नागरिकांना 10 लाखाचा गंडा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:59
Rating: 5