बसमधील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाचा पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
पुणे, दि. 31, जानेवारी - पीएमपीएल ने प्रवास करत असताना ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना सकाळी साडे दहा ते बाराच्या सुमारास घडली. याबाबत हर्षल साखरे (वय 35, गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल साखरे यांचे वडील भारत साखरे सोमवारी सकाळी चिंचवड-काञज बसने डांगे चौक ते शिवाजीनगर हा प्रवास करत असताना एका अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील सोन्याचे दागिने व रोख 18 हज़ार 850 असा रुपये असा एकूण दोन लाख 73 हजार 850 रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. यापूर्वीही भोसरी, वाकड, आळंदी अशा विविध ठिकाणी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.