ऑल इंडिया टेनिस टॅलेंट सीरीज टूर्नामेंटमध्ये हृति अहूजाला विजेतेपद
मुंबई, दि. 18, जानेवारी - गोरेगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित ऑल इंडिया अंडर-12 टेनिस टॅलेंट सीरीज टूर्नामेंट मध्ये ठाणे जिमखाना ऑफिसर्स क्लबच्या हृति अहूजा हिने विजेतेपद पटकावून चमकदार कामगिरी केली आहे.
गोरेगाव येथे झालेल्या या ऑल इंडिया टेनिस टैलेंट सीरीज टूर्नामेंट मध्ये दिल्ली, बंगळूरु, चेन्नई, मद्रास, गोवा, केरळ आदी राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अं तिम लढत हृति अहूजा व पुण्याची उरवी काटे यांच्यामध्ये झाली यामध्ये 6-1,6-2 ने हरवत हृति अहूजा हिने विजेतेपद पटकावले.
ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशनमध्ये शिकणारी हृति अहूजा हिने वयाच्या 8 व्या वर्षांपासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली आणि मेहनत व जिद्दीच्या जोरावर अल्पावधीत तिने हे यश संपादन केले आहे. तिचे हे पहिले ऑल इंडिया लेवलचे विजेतेपद आहे, याआधी हृति ने अंधेरी येथे झालेल्या स्पर्धेत उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. परंतु तिने घेतलेल्या मेहनतीमुळे तिला हे यश प्राप्त झाल्याचे प्रशिक्षक तुषार धायगुडे यांनी सांगितले.