मुंबई : मराठवाड्यातील उद्योगांची एकत्रित माहिती असलेल्या डिरेक्टरीचे लोकार्पण आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. मराठवाडा परिसरातील सुमारे सातशे उद्योजकांची माहिती यात संग्रहित केली आहे. यात वाहन उद्योग, इंजिनिरिंग, स्टील, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण यासह विविध क्षेत्रातील उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर ही संस्था गेली 50 वर्ष कार्यरत असून दर दोन वर्षातून ही डिरेक्टरी प्रकाशित करण्यात येते. या कार्यक्रमाला चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रसाद कोकील, माजी अध्यक्ष गौतम नंदावत आणि आशिष गर्दे उपस्थित होते.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर डिरेक्टरीचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:30
Rating: 5