पैसापेक्षा पाणी बचतीला महत्व देण्याची गरज-सुखदेव फुलारी
नगर तालुक्यातील नारायणडोह येथील डॉ.ना.ज.पाउलबुद्धे इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यासाठी आयोजित तज्ञ मार्गदर्शक कार्यक्रमात "रेनवॉटर हार्वेस्टिंग व पाणी बचत" या विषयावर बोलतांना फुलारी पुढे म्हणाले,उपशाचे प्रमाणात जलपुनर्भरण होत नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.शेती व पिण्याचे शास्वत पाण्यासाठी विहीर व बोअरचे पुनर्भरण करण्याची आवश्यकता आहे.
पावसाचे प्रमाण कमी कमी होत असताना जमिनीतील पाण्याचा उपसा व वापर दिवसेंदिवस वाढतच आहे.त्यामुळे आपल्या समोर जल संकट उभे राहिलेले आहे.यातून बाहेर पडायचे असेल उपासाचे प्रमाणत जल पुनर्भरण केले पाहिजे.शिक्षण ,वैज्ञानिक व आर्थिक दृष्ट्या मानवाने कितीही प्रगती केली असली तरी शेती आणि पिण्यासाठी हवे तितक्या पाण्याची कृत्रिम निर्मिती करूच शकत नाही.पाण्यासाठी आणि अन्न धान्यासाठी मानवाला निसर्गाचीच साथ घ्यावी लागते.त्यामुळे शाश्वत पाण्यासाठी आपल्या घराचे परिसरात व शेतात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविला पाहिजे. रेनवॉटर हार्वेस्टिंग हा जल पुनर्भरणचा कमी खर्चातील सर्वोत्तम पर्याय आहे.घरात व शेतात पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
प्रा.प्रशांत कराड यांनी फुलारी यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर प्राचार्य बाळासाहेब बोरडे, उपप्राचार्य जे.ए.अली, संगणक विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका पी.एस.भावले, नागेबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मनवेलीकर उपस्थित होते
