Breaking News

कुंभाराच्या मोर्चाचं पुराण...


दिनांक 05 मार्च 2018 रोजी कुंभार समाजातील काही मंडळी मोर्चा काढण्याची तयारी करीत आहेत. या मोर्चाला या मंडळींनी अस्मिता- स्वाभिमान अशी गोंडस उपाधी लावून समाजबांधवाची शुध्द दिशाभूल सुरू केली आहे.हा मोर्चा समाजासाठी स्वाभीमानाचा किंवा अस्मितेचा कसा ठरू शकतो असा भाबडा प्रश्‍न माझ्यासारख्या सामान्य कुंभाराला पडला आहे.

आणि सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार केला तर या मोर्चाचे नेतृत्व करणार्या टोळक्यांची सामाजिक कायदेशीर पार्श्वभुमी पडताळणे आवश्यक बनले आहे.समाजाचा विश्वासघात करणारी टोळी म्हणून या मंडळींची कुंभार समाजात ओळख आहे.या मंडळींनी समाजात गट तटाचे विष पेरून समाजाची छकले पाडण्याचे पाप केले आहे.या मंडळींच्या फाजील महत्वाकांक्षेमुळे एक कुंभार दुसर्या कुंभाराकडे अविश्वासाने डोळे वटारीत आहे.या अर्थाने समाजाचे गुन्हेगार असलेली ही टोळी कायद्याच्या नजरेतही सज्जन ठरू शकत नाही.समाजात फुट पाडून समाजाच्या असंघटीतपणाचा फायदा घेऊन समाजाच्या सामुहिक मालकीच्या,देवस्थानाच्या जमीन यांनी बळकावल्या,विकल्या आहेत.अशा मंडळींच्या हातात असलेले मोर्चाचे नेतृत्व सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने कोलीत ठरण्याची भिती समाजातून व्यक्त होत आहे.म्हणून गृहखात्याच्या स्थानिक गुप्तवार्ता विभागाने म्हणजे ऐलआयबीने यांच्या चारिञ्याची तपासणी करून मोर्चा सुखरूप पार पडेपर्यंत त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे इष्ट ठरेल.

फिरत्या चाकावर देशी मातीला आकार विठ्ठला तु वेडा कुंभार असे संतवचन सकल मानवजातीला दिशा देत असताना गोरोबा रायांचा माझा कुंभार अजूनही काही भोळसट समजुतीतून बाहेर पडायला तयार नाही. खरे तर हा समाज अगदी पहिल्यापासून गावगाड्या बरोबर मनमोकळा वावरणारा म्हणून ओळखला जातो. गावकीचे कुठलेच काम कुंभाराच्या सहभागाशिवाय पुर्णत्वास जात नाही. विस्कटलेल्या मातीला रांधून नव आकार साकारण्याची अफाट कल्पना शक्ती उपजत असलेला हा कुंभार भट्टीत तावून सुलाखून निघालेला आहे. म्हणून माझ्या या समाजाला कुणीही वेड्यात काढू शकत नाही. मात्र सामाजिक गावसंस्काराची शिदोरी सतत पाठीशी असल्याने या समाजाने शक्यतो कुणाचा उपमर्द केला नसेल. तो सोशिक आहे, भेकड नाही. तो भोळसट असेल पण बावळट नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत तो सारे सहन करतो. सर्वांचे चाळे पाहतो आणि डोक्यावर पाणी वाहू लागले की चाळ्यांसह चाळकर्‍यांना भट्टीत भाजून काढतो. या समाजबांधवांची दिशाभूल करून आपली दुकानदारी चालवण्याचे नसते उद्योग काही मंडळींनी सुरू केले आहेत, दुर्दैवाने ही उद्योगी मंडळी समाज बांधव आहेत. म्हणून माझ्या सारख्या सामान्य कुंभाराला या उद्योगी मंडळींचा खरा चेहरा दाखविण्याचा मोह टाळता येत नाही.

येत्या पाच मार्चला या उद्योगी मंडळींनी आयोजित केलेला मोर्चा निव्वळ दिशाभूल आहे या विषयावर मला माझं मत एक सर्व सामान्य कुंभार म्हणून मांडावयाचे आहे कोणत्याही संघाचा किंवा संस्थेचा पदाधिकारी म्हणून नाही ज्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जात असल्याचे सांगीतले जात आहे ते प्रश्‍न आज निर्माण झालेले नाहीत. 20 वर्षापासून ते प्रश्‍न आहे तसेच आणि हा अस्मिता,स्वाभीमान वगैरे नामाभिधान दिलेला मोर्चा झाल्यानंतरही या मागण्या पुन्हा राहणार नाहीत याची हमी यापैकी किती मंडळी देऊ शकतील? हा मोर्चा समाजाची अस्मिता किंवा स्वाभीमान नाही तर समाजाच्या ताकदीवर या मंडळींना आपली राजकीय अस्मिता जतन करायची आहे. मोर्चासाठी या मंडळींनी मांडलेला मागण्यांचा प्रपंच नेटका नाही तर भटका आहे. या मंडळींच्या तत्वज्ञानानुसार कुंभाराचा एनटी प्रवर्गात समावेश व्हावा,खुळ्यांनो! असे झाल्यास कुंभार समाजास 19 टक्के ओबीसी मधून एनटी चे 3 टक्के आरक्षणावर समाधन मानावे लागेल व तेही फक्त महाराष्ट्रातच.. एनटी केंद्रात ओबीसीच मग महाराष्ट्रात 19 च्या ऐवजी कुंभारांना 3 टक्के होईल ? हे वास्तव या मंडळींच्या टाळक्यात का शिरत नाही. एन टि प्रवर्गात जाण्यासाठी आधारभूत निकष सादर करावे लागतात.ते निकष कोणते याचा किती अभ्यास या मंडळींनी केला?एनटी प्रवर्गात समावेश होण्यासंदर्भात शासनाला हे कसे पटवणार?

आरक्षणाचा सारा खेळखंडोबा झाला आहे, सुप्रिम कोर्टाच्या आदेशा नुसार 49% आरक्षणापेक्षा जास्त आरक्षण वाढवता येत नाही आणि 49% आरक्षण देशपातळीवर पुर्ण आहे.महाराष्ट्राच्या मंत्रालयात कुंभार समाज्यासाठी वेगळ्या महामंडळाची मागणी सन 2009 ला केली होती ती शासनाने फेटाळून लावली किंवा देता येणार नाही.म्हणून सांगितले मग आता नविन नावाने मातीकला बोर्डाची (महामंडळ) मागणी होत आहे, महाराष्ट्र शासन सध्या आर्थिक अडचणीत आहे म्हणून शासनाने कर्मचारी कपात धोरण स्वीकारले आहे. महामंडळे बंद होतआहेत, किंवा आर्थिक टंचाईमुळे अडगळीत पडले आहेत. अशा आर्थिक आणिबाणीच्या काळात कुंभाराचं धावत गाढव सरकार अंगावर घेइल का? याचे भान न बाळगता नविन बोर्ड किंवा मंडळ मिळण्याची अपेक्षा ठेवणे पढत मुर्खपणा आहे.आणि समजा माती कला बोर्ड सरकारने दिलेही तरी त्याचा फायदा महाराष्ट्रातील माती काम करणार्‍या कुंभार समाज्यातील किती लोकांना होईल? माती काम करणार्‍या कुंभारांची जनगणना झाली आहे का ? विट भट्टी काम करणार्‍यांची जनगणना केली का? किती कुंभार माती काम करतात याची आकडेवारी सांगता येत नसल्याची शोकांतीका आहे , तरीही माती कला बोर्डाची मागणी करण्याचा शहाजोगपणा कितपत योग्य आहे तेर या तीर्थक्षेत्रास अ दर्जा मिळावा ही मागणी आहे . 

पण तेरला ब दर्जा कसा व कोणा मुळे मिळाला ब दर्जा मिळवण्यासाठी कोणी पाठपुरावा केला आहे कोणी किती प्रयत्न केले हे वास्तव समाजाला कोण सांगणार?समाज्याला सत्य सांगण्याचे धाडस दाखविण्याऐवजी वस्तूस्थिती पासून दुर पळण्याचा उपाय म्हणून या मंडळींना मोर्चा काढण्याची गरज भासली ही शक्यता नाकारता येत नाही. समाजाचे कल्याणच करायची इच्छा आहे ना मग डा.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेला मार्ग चोखाळा.समाजाचे कल्याण करायचे असेल तर सत्तेत वाटा मागा.मोर्चाच्या झेंड्या आड अस्मिता दाखविणार्यांनी कुंभार समाजाला विधान परिषद व विधान सभेवर प्रतिनिधीत्व मागण्याची हिम्मत दाखवावी. तेंव्हा कुठे खर्‍या अर्थाने कुंभार समाजाचा स्वाभीमान राखला जाईल. समाजाची ताकद वाढेल. आता या मोर्चाला पाच लाख कुंभार येतील असा आडाखा बांधून मोर्चाचा खर्च या मंडळींनी पन्नास लाख ते एक कोटी एव्हढा अपेक्षित धरला आहे. कसे मांडले हे गणित? कुंभारांची जनगणना झाली नाही तर पाच लाख हा आकडा कुठून आणला?समाजाच्या घामाचा हा पैसा खर्च होणार आणिही झालकरी मंडळी मोर्चात मिरवून फक्त एक निवेदन मा. मुख्यमंञ्यांना देणार.त्यासाठी एव्हढा खर्च ? आणखी महत्वाची बाब म्हणजे मोर्चा दरम्यान संभाव्य कायदा व सुव्यवस्था , इतर लोकांची गैरसोय तसेच सार्वजनिक शांतता भंग या प्रकारचे उल्लंघन होणार नाही या ओघाने येणार्या गोष्टींवर या मंडळींनी किती गंभीरपणे विचार केला हेही महत्वाचे आहे.

समाजातील सुशिक्षित युवकांनी याचा गांभिर्याने विचार करायला हवा. कुंभार समाज कुणा एखाद्या संघटनेची मक्तेदारी नाही,खासगी मालमत्ता तर मुळीच नाही.समाज महत्वाचा,त्याचे ऐक्य महत्वाचे.संघटना येतील जातील समाजाचे संघटीत अस्तित्व टिकले पाहिजे म्हणून आज समाजात कार्यरत असलेल्या छोट्या मोठ्या संघटनांनी एकञ बसून निर्णय घेणे समाजाच्या हिताचे आहे.त्यासाठी अस्मिता आणि स्वाभीमानाच्या ठेकेदारांनी या गटागटात विखूरलेल्या कुंभाराला एकञ आणण्याचे कर्तव्य पार पाडावे,दार अन् आळा अन् आळा टिपून जनगणना करून घ्यावी आणि नंतर स्वाभीमानाचा झेंडा रोवण्याची वल्गना करावी. कुंभार रत्न देशभक्त माजी राज्य मंत्री कै. रत्नाप्पा कुंभार यांच्या सहकार्यामुळे 1972 साली समाजाला कादिंवली चारकोप येथील 6 एकर जागा मिळाली परंतू समाज एकत्र न आल्यामुळे ती आता केवळसाडेचार एकरउरली आहे .त्यातही 1 एकर वर अतिक्रमण आहे. त्या जागेचा या क्षणापर्यंत पर्यंत विकास साधता आला नाही.जे हातात मिळाले, ते पदरात राखणे जमले नाही आणि निघाले अस्मितेचे झेंडे उडवायला!

भारतीय संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 मध्ये बारा बलुतेदार समाजाला एससीमध्ये घेण्याची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन बारा बलुतेदार समाजातील गांधीवादी नेत्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, दृष्टीकोन वेगळा असल्यामुळे या शिफारशींना विरोध केला होता. मात्र आज 70 वर्षांनंतर देखील काहीजणांनी आज आपण एससी,एसटी किंवा एनटीमध्ये असावे असे वाटायला लागले आहे. वास्तविक एससी,एसटी किंवा एनटीमध्ये जाण्याचे ज्यांना दिवास्वप्न पडू लागले आहे, त्यांना कदाचित आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितींचा विसर पडला असावा. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांनतर आजचा बलुतेदार समाज हा सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्टया बर्‍यापैकी स्थिरस्थावर झालेला आहे. असे असतांना बारा बलुतेदार समाज हा एससी, एसटी किंवा एनटीमध्ये जाण्यासाठी मागासवर्गींय आयोगांच्या अहवालात नमूद केलेल्या तरतूंदीमध्ये बसत नाही. त्यामुळे आपली दुकानदारी चालावी यासाठी महाराष्ट्र राज्य कुंभार महासंघातील चार टाळकी संपूर्ण समाजाला वेठीस धरू पाहत आहे. आज राज्यातील महामंडळाची परिस्थिती डबघाईला आलेली आहे. हे सर्वांनाच माहित असतांना देखील समाजासाठी महामंडळ मागण्याची भूमिका ही समाजाला आणखी काही वर्ष पाठीमागे घेवून जाणारी आहे. त्यामुळे ही विसंगत भूमिका समाजबांधवानी समजावून घेण्याची गरज आहे. समाजबांधवाचा एक घटक म्हणून मी स्वता: अशोक सोनवणे, समाजाच्या न्याय हक्कांसाठी न्यायालयीन लढा देत आहे. आज आपला समाजातील युवक हा जातीपातीच्या भिंती तोडून ग्लोबल विचार करत आहे. प्रस्थापित समाजाबरोबर या समाजाचे आजही सामाजिक सलोख्याचे संबध आहेत, हे संबध चिरकाल आहेत, तसेच राहावे, यासाठी समाजाचा जवाबदार घटक म्हणून, आपण सर्वांनी अधिक सजग राहायला हवे, हा म्हणून प्रपंच 
विचारा जाब... घ्या उत्तरमोर्चा काढून अवघा समाज सरकार विरूध्द आहे हा संदेश समाजाच्या मालमत्तेवर टोळीने धाड टाकणारे भामटे देत आहेत का?
महामानवाने देशाला घटना दिली.सर्वाना सारखा अधिकार दिला.त्या घटनेलाच छेद देऊन घटनाकारांपेक्षा हे मोर्चाचे नेते स्वतःला श्रेष्ठ समजतात का?
संतभूमी आळंदी श्री क्षेञ येथील समाजाची सामुहिक जमीन विकून खाणारे चार टोळके समाजाला न्याय देणार का?
या मोर्चामुळे कुंभार समाजाचे सामाजिक आणि शासनपातळीवर होणारी दुरगामी हानी भरून काढण्याची पात्रता या टोळक्याकडे आहे का?
माती कामावर लावला जाणारा कर नेमका काय आहे? याचा अभ्यास या समाजद्रोह्यांनी केला आहे का?

आपलाच समाजबांधव
अशोक सोनवणे 
अहमदनगर