बचतगटांनी ई-कॉमर्सचा अवलंब करुन उत्पादनांची ऑनलाईन विक्री करावी - राज्यपाल
ग्रामविकास विभागामार्फत वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर बचतगटांच्या उत्पादनांच्या सरस महालक्ष्मी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार तृप्ती सावंत, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, नाबार्डचे उप व्यवस्थापकीय संचालक अमलोर पावनाथन, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.
