Breaking News

आठ दिवसात प्रांत कार्यालयाला टाळे ठोकणार एकलव्य संघटनेचा इशारा


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी :- समाजाच्या विविध मागण्यांसाठी येथील प्रांत कार्यालयावर एकलव्य संघटनेच्यावतीने आज {दि.२९} दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यापुढे भिल्ल समाज बांधवाना विविध दाखले देण्यास टाळाटाळ करण्यात आली तर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल जाधव, श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष सुभाष मोरे, युवा जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, टायगर फोर्सचे अध्यक्ष राजेंद्र भालेराव, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष दिलीप मोरे आदींससह शेकडो कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते.