Breaking News

ध्येयवादी तरुण अत्युच्च विकासाची बलस्थाने : प्राचार्य डॉ. देशमुख


संगमनेर / प्रतिनिधी :- स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाची प्रगती अभिमानास्पद झाली आहे. आपल्या बरोबरच स्वातंत्र्य मिळालेल्या इतर राष्ट्रांच्या तुूलनेत आपण निश्चित पुढे आहोत. आजचा तरुण हाच उद्याचा आधारस्तंभ आहे. ध्येयवादी तरुणच देशाचा विकास करु शकतील. त्यामुळे असे धेयवादी तरुण देशाची बलस्थाने आहेत, असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी केले. 

प्रजासत्ताकदिनी उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी आदींसह विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरीक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय छात्रसेनेचे कॅप्टन डॉ. अरुण गायकवाड, प्रा. बी. सी. मणियार, हेमलता तारे यांनी छात्रसेनेचे संचलन केले.