Breaking News

दंत उपचारासाठी सीबीसीटी प्रणाली प्रभावी ठरेल - हुजेफा बोहरी


दैनंदिन जीवनात फास्टफूडचे सेवन अधिक प्रमाणात करत असल्याकारणाने सर्वसामान्यांच्या सवयी बदलत असलेल्या दिसून येत आहेत. त्यातच व्यायामाच्या अभावामुळे अनेक नवनवीन व्याधी निर्माण होत आहेत. विशेषत: मुलांमध्ये चॉकलेट आणि फास्ट फुडमुळे दातांचे विकार वाढत आहेत. या विकारांवर वेळीच उपचार केल्यास ते लवकर बरे होवू शकतात. शहर डेंटल शाखेच्यावतीने नवनवीन उपचार पद्धतीची शहरातील डॉक्टरांना माहिती व्हावी, नवनवीन मशिनरीची ओळख व्हावी यासाठी विविध तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असते. सीबीसीटी उपचार प्रणालीमुळे तोंडाचे विकारांचे निदान होण्यासाठी सीटी स्कॅन करण्यात येणार असून त्यामुळे तोंडाचे कॅन्सर, गाठी, सायनस, इमप्रामांट, रुट कॅनल, एक्स रे आदी उपचार पद्धती राबविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन दंत वैद्यकीय नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. हुजेफा बोहरी यांनी केले. शहर जिल्हा दंत वैद्यकीय शाखेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. हुजेफा बोहरी बोलत होते. यावेळी शाखेचे सचिव डॉ. मुस्कान तलरेजा, डॉ. अनुसया, डॉ. प्राची पाटील, डॉ. अविनाश वारे, सचिन राणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना डॉ. अनुसया म्हणाल्या, सध्या दंत वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे बदल घडत आहेत. नवनवीन उपचार पद्धती कार्यान्वित होत आहेत. या उपचार पद्धतीचा शहरातील डॉक्टरांनी अवलंब केला पाहिजे, असे सांगून विविध विकार, त्यावरील उपचार पद्धती आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या मशिनरींची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ओंकार भालसिंग यांनी केले तर आभार डॉ. विनोद मोरे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ. संजय आसनानी, डॉ. अभिजित मिसाळ, डॉ. ओंकार कुलकर्णी, डॉ. सुमित नलावडे, डॉ. प्रताप घोडके, डॉ. महेश नाथ, डॉ. सोनिया औटी, डॉ. मंजुषा गांधी, डॉ. संदिप पवार, डॉ. सलमान शेख, डॉ. रुही सय्यद, डॉ. महेश गव्हाणे, डॉ. किरण खांदे, डॉ. प्रमोद निक्रड, डॉ. कुणाल कोल्हेंसह शाखेचे सदस्य उपस्थित होते.