Breaking News

समाजमाध्यमे वापरताना सतर्कता बाळगा - रंजनकुमार शर्मा

आज सायबर गुन्हे अधिक तेजीने घडत असताना दिसून येत आहेत, सर्वाधिक इंटरनेटचा वापर, समाज माध्यमांचा वापर आपल्याच म्हणजेच महाविद्यालयीन विद्यार्थी करत असताना दिसून येतात, समाजमाध्यमांचा वापर करत असताना सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, 


दैनंदिन जीवनामध्ये आपले इंटरनेट वापराचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या चुका, अज्ञान यांमुळे सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या गोष्टींना आळा बसण्यासाठी मोबाइल, इंटरनेट, एटीएम यांच्या वापराबाबत योग्य मार्गदर्शन होणे गरजेची आहे. सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. यामुळे याबाबत समाजामध्ये जागृती करण्याची गरज भासू लागली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.

न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये सायबर गुन्हेगारी बाबत जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे होते.