Breaking News

संगमनेर तालुका दूधसंघातील भ्रष्टाचार थांबवा भाजप कार्यकर्त्यांचे दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांना निवेदन


संगमनेर तालुका दूध संघात दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असून शासनाने दूध खरेदीदर कमी केलेले नसतानाही संघाने दूध खरेदी दरात मोठी कपात केली आहे. शासनाच्या सर्व योजनांचा संगमनेर तालुका दूध संघ लाभ घेत असताना देखील दूध संघाकडून सरकारचा दूधउत्पादकांमध्ये अपप्रचार सुरु आहे. शासनाची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या दूध संघांवर फोजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आज भाजप कार्यकर्त्यांनी दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. संगमनेर तालुका दूध संघ दरवर्षी नफ्यातून मोठ्या रिबेट वाटपाची घोषणा करते परंतु प्रत्यक्षात वाटप करताना त्यात मोठी कपात केली जाते ज्यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून करण्यात आला. यासर्व बाबींची चौकशी होऊन कारवाई व्हावी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष राजेंद्र सांगळे, जिल्हा सरचिटणीस भरत फटांगरे, शहर सरचिटणीस सुदाम ओझा, तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, नानासाहेब खुळे अशोक कानवडे, महेश जगताप आदींसह कार्यकर्त्यांनी केली.